पाटील यांनी पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बावडा (ता.इंदापूर) येथे आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी रांगेत उभे राहून व कोरोनाचे नियम पाळून मतदान केले. त्यानंतर यावेळी मतदान बूथ वरील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी हर्षवर्धन पाटील यांनी संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील पदवीधर मतदार संघाच्या ३ व शिक्षक मतदार संघाच्या २ अशा सर्व ५ जागी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठा विजय संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला.
--
घडी बसता बसता बसेना!
राज्याचे एकेकाळचे काँग्रेस पक्षाचे दिग्गज व सध्याचे भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. मतदानानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी भल्यामोठ्या मतपत्रिकेचे वर्णन करताना घडी बसता बसेना असे विनोदाने म्हणताच कार्यकर्त्यात हास्य कल्लोळ माजला.
———————————
फोटो ओळी : पदवीधर मतदारसंघासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथील बुथवर मतदानाचा हक्क बजावला.
०११२२०२०-बारामती-१६