शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अनधिकृत राजकीय फलक झळकताहेत

By admin | Published: January 13, 2017 3:14 AM

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आचारसंहिता लागू झाली असली, तरी शहरातील प्रमुख चौक, रस्त्यावरील

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आचारसंहिता लागू झाली असली, तरी शहरातील प्रमुख चौक, रस्त्यावरील राजकीय फलक, पदाधिकाऱ्यांचे नामफलक, राजकीय पक्षांचे फलक जसेच्या तसेच गुरुवारी दिसून आले. अशा पध्दतीने राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडून निवडणूक आचारसंहितेची ऐशीतैशी सुरू असल्याचे दिसून आले. अखेर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अनधिकृत राजकीय फलकांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून महापालिका क्षेत्रासाठी आचारसंहिता जारी झाली आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने नियोजन केले आहे. महापालिका २० पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेतली आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी फलक उभारले होते. आता लक्ष्य २०१७ असे फलक उभारले होते. सर्वच पक्षांच्या पदाधिकारी आणि इच्छुकांनी फ्लेक्सबाजी सुरू केली होती. त्याचबरोबर नववर्षाचे फलकही इच्छुकांनी उभारले आहेत. आचारसंहिता जारी झाली असली तरी सर्वच प्रभागांमध्ये राजकीय फलक काढण्याची मोहीम प्रशासनाने तीव्र केलेली नाही. अ,ब,क,ड,ई आणि फ या प्रभागातील विविध सोसायट्या, रस्त्यावर फलक दिसून येत आहे. पिंपळे गुरव येथील महापौर शकुंतला धराडे यांच्या निवासस्थानाकडे जाणारा फलक झाकलेला आहे. मात्र, अन्य पदाधिकाऱ्यांचे फलक रस्त्यावर दिसून येत आहेत. यासंदर्भात निवडणूक विभागाकडे तक्रारी झाल्यानंतर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. (प्रतिनिधी)रस्त्यावर झळकताहेत अनधिकृत जाहिराती निवडणूक असल्याचे प्रभागामध्ये लहान फ्लेक्सला पीक आले आहे. इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स उभारले आहेत. तसेच रस्त्याच्या दुभाजकावरील विद्युत खांबांना मोठ्या प्रमाणावर फलक लावण्यात आलेले आहेत. अनधिकृत फलकांकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे, त्यामुळे आचारसंहितेची ऐशीतैशी सुरू असल्याचे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे. राजकीय नेत्यांच्या वाहनांवरील स्टिकर ‘जैसे थे’ महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने तसेच इच्छुक, नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवरील मागील काचेवर लक्ष्य २०१७ असे स्टिकर लावण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर मात्र निवडणूक विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. यावर कारवाई करण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. मोटारी रंगल्या प्रचाराच्या ‘स्टिकर’नीपिंपरी : वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात असून, वाहतूक नियमांच्या जनजागृतीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या धामधुमीत मोटारींच्या काचांवर सर्रासपणे इच्छुकांचे मोठ्या आकाराचे स्टिकर चिकटविलेले असताना त्याकडे मात्र डोळेझाक होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेची निवडणूक २१ फेबु्रवारीला होत असून, राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. इच्छुकांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मतदारांच्या भेटीगाठी, इच्छुकांच्या नेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या मुलाखती, पक्षप्रवेश, उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड असे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. राजकीय पक्षांनीही जोरदार ताकत लावली आहे. इच्छुकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात असून, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे. इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी मोटारींवरील काचेवर स्टिकर चिकटविले आहेत. त्यावर इच्छुकांच्या फोटोसह पक्षाचे चिन्ह, महापालिका इमारतीचा फोटो, ‘लक्ष्य २०१७’ असा मजकूर दिसून येत आहे. एकीकडे काळ्या काचांवर कारवाई करीत दंड आकारणाऱ्या पोलिसांकडून मात्र स्टिकर चिकटविलेल्या वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. एरवी इतर वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जाते. दंड वसूल केला जातो. मात्र, राजकीय नेत्यांचे स्टिकर लावून शहरभर फिरणारया वाहनांकडे मात्र डोळेझाक केली जात आहे.(प्रतिनिधी)