कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे घरात बसून कंटाळलेल्या लोकांना पावसामुळे थोडावेळ अल्हाददायक वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, गुळूंचे, बारामती तालुक्यातील निंबुत, फरांदे वस्ती येथे अवकाळी पाऊस जोरदार पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच नीरा डाव्या कालव्याच्या परिसरात टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. वाऱ्यामुळे कारले व टोमॅटोच्या शेतातील काठ्या व तारांची पडझड झाली आहे. फुलकळी अलेल्या टोमॅटोवर पावसाचा मारा पडल्याने टोमॅटो पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. उस तोडणी हंगाम सुरू आहे. तोडणीसाठी आलेला कामगारांचे पावसाने हाल झाले. पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
१४ नीरा रेन
कर्नलवाडी येथील कोंडेवाडीमध्ये नारळाच्या झाडावर वीज पडल्याने काही काळ पेट घेतला.