कुरुळी, मोई, निघोजे, चिंबळी यांसह अनेक भागांत पावसाची रिमझिम झाली. परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा काढणीसाठी आलेला गहू जमिनीवर झोपला आहे. तर काही ठिकाणी गहू काढणी चालू असताना पाऊस आल्याने गहू भिजल्याने शेतकऱ्यांची गहू गोळा करण्यासाठी धावपळ उडाली होती, गुरुवारी सकाळी थंडी होती. तर दुपारी आभाळ आल्याने हवेत उष्णता वाढल्याने गरम होत होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे सुरू झाले. त्यामुळे परिसराला एकाच दिवशी हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन ऋतू अनुभवायला मिळाले आहेत. तासभर सुरू असलेल्या या पावसामुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी, नागरिक, मजुरांची चांगलीच धांदल उडाली होती. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या गव्हाचे ज्वारीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या वेळी काही काळासाठी वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
अवकाळी पावसाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:32 AM