पुणे : भारतात चाईल्ड पॉनोग्राफीला बंदी असून असे व्हिडिओ यु ट्युबवर अपलोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वाच्च न्यायालयाने दिले होते़. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने सुमारे ३५ हजार चाईल्ड पॉनोग्राफीचे आयपी अॅड्रेस विविध राज्यातील पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आले होते़. पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून ते त्या शहरातील सायबर पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आले असून पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातून सुमारे ५०० हून अधिक चाईल्ड पॉनोग्राफी अपलोड करण्यात आले आहेत.पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यातून या आयपी अॅड्रेसवरुन संबंधितांचा मोबाईल क्रमांक शोधून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे़. याबाबत खडक पोलीस ठाण्यात चाईल्ड पॉनोग्राफीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे़. तो व्हिडिओ एका अल्पवयीन मुलाने अपलोड केला असल्याचे निष्पन्न झाले आहे़.या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई समीर पटेल यांनी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़. या फिर्यादीवरुन पोलिसांनी राज करण पुट्टीलाल (रा़ गुरुवार पेठ) यांना अटक केली आहे़. त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा, बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम १४ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. याबाबतची माहिती अशी, राज करण पुट्टीलाल याच्या मोबाईलवरुन २८ एप्रिल २०१९ रोजी रात्री साडेअकरा वाजता लहान मुलांचे अश्लिल व्हिडिओ यु ट्युबवर अपलोड करण्यात आला होता. पोलीस महासंचालकांकडून मिळालेल्या आयपी अॅड्रेसच्या मिळालेल्या माहितीवरुन त्यांच्या मोबाईलवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले़. हा मोबाईल जरी त्यांच्या नावावर असला तरी त्यांनी त्याचे सीमकार्ड आपल्या काकाच्या मुलाला दिले होते़. हे सीम कार्ड त्यांचा काकाचा मुलगा वापरत आहेत़. त्याने तो गेल्या वर्षी अपलोड केला होता़,विशेष म्हणजे त्यावेळी तो अल्पवयीन होता़. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे अधिक तपास करीत आहेत.
एकट्या पुण्यातून अपलोड झाले ५०० चाईल्ड पॉनोग्राफी व्हिडिओ ; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 8:59 PM