UPSC exam postponed : यंदाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २६ मे २०२४ रोजी होणार होती. पण लोकसभा निवडणुकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा १६ जून २०२४ रोजी होणार आहे. यापूर्वी कोरोनाकाळात या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता लोकसभा निवडणुकांमुळे परीक्षा नियोजनावर परिणाम पडू नये यासाठी आयोगाने काळजी घेत पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.
युपीएससीची पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात असते. तर त्यानंतर होणारी मुख्य परीक्षा लेखी स्वरुपाची असते. लेखी परीक्षेतील मेरीटनुसार परीक्षार्थींना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून निकाल लावला जातो. प्रत्येक वर्षी देशातील लाखो उमेदवार या परीक्षांची तयार करत असतात.
नागरी सेवा पूर्व परीक्षेतूनच भारतीय वन सेवेच्या मुख्य परीक्षांसाठी उमेदवार निवडले जातात. त्यामुळे वन सेवेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही पूर्व परीक्षा पुढे गेली आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षा ही वन सेवा आणि इतर सर्व नागरी सेवांसाठी एकच असते.