नामदेव राक्षे यांची मुरमाड डोंगराळ भागात अडीच एकर क्षेत्र आहे. या भागात त्यांनी ऊस पिकाचे खोडवे काढून त्यांनी उभी आडवी नांगरट करून शेतात कोंबड खत व शेणखत यांचे योग्य मिश्रण करून चार फुटी बेड काढले या बेडवरती त्यांनी ड्रीप व मल्चिंग अंथरूण दोन महिन्यांपूर्वी शुगर क्युन कलिंगडाची लागवड केली. त्यातचमध्ये सितारा जातीची मिरची लागवड केली आहे. कलिंगड काढणी झाली की त्याचं शेतात मिरची तोडणी चालू होईल असे नियोजन केले आहे. बेडवर मधमाशा येण्यासाठी व पिकांचे परागीभवन होण्यासाठी त्यांनी ठिकाणी झेंडूची लागवड केलेले आहे.
शेतात एक-दोन-तीन किलोपर्यंत फळ तोडणे योग्य झालेली असून बाजारात किलंगडला प्रतिकिलो वीस रुपयांचा दर मिळत आहे. ढगाळ वातावरणमुळे महागडी औषधे फवारणी करावी लागली. खराब वातावरणात कलिंगड प्लॉट त्यांनी योग्य नियोजन करून आणला आहे.
खर्च हा राक्षे अडीच एकर कलिंगडासाठी यांना ड्रीप, मल्चिंग, मिरची रोपे ,कलिंगड रोपे दोन लाखांच्या पुढे आलेला असून कलिंगड मिरची पिकातून त्यांना चार लाख निव्वळ नफा होणार आहे.
--
शेतीमध्ये कष्ट भरपूर आहेत मात्र ते प्रामाणिकपणे केले तर त्यातून चांगले उत्पन्नही निश्चित मिळते त्यामुळे घरात शेती असेल तर तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीच्या अभ्यास करून मेहनत घेऊन शेती करावी.
-नामदेव राक्षे,
कलिंगड उत्पादक
--
०६रांजणगाव सांडस कलिंगड उत्पादक