दौंड/न्हावरे : उरळगाव (ता. शिरूर) येथे ११ लाख ७७ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त केली असल्याची माहिती उत्पादनशुल्क दौंड विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छतीसगड येथून ही दारू आणली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवाजी सातरस हा फरार झाला आहे. उरळगाव येथे शिवाजी सातरस याच्या राहत्या घराच्या परिसरात बनावट दारूचा साठा असल्याची माहिती उत्पादनशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. या वेळी त्याच्या घरात आणि घराबाहेर असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये एकूण ८८ दारूचे बॉक्स सापडले. कारवाई पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सुनील चव्हाण, पुणे जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या कारवाईमध्ये निरीक्षक नंदकुमार जाधव, निरीक्षक प्रसाद सास्तुरकर, उपनिरीक्षक राजाराम शेवाळे, नवनाथ मारकड, संजय साळवे, विजय मुणगेकर, गोरख निळ, अहमद शेख, विजय विंचुरकर, अश्विनी घोडके, केशव वामने यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
उरळगावला बनावट विदेशी दारू जप्त
By admin | Published: August 03, 2015 4:27 AM