ग्रामोन्नती मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव, आय.टी.सी. मिशन सुनहरा कल डेव्हल्पमेंट सपोर्ट सेंटर नारायणगाव आणि श्री. शरदचंद्र पवार अॅग्रीकल्चर अॅन्ड डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, निमगाव सावा यांच्या संयुक्त विद्यमाने निमगावसावा येथे माती परीक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या वेळी शेतकर्यांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवून माती परिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, निमगाव सावा गावचे सरपंच किशोर घोडे, डी.एस.सी.चे भरत राऊत, प्रगतशील शेतकरी परशुराम लगड, नजीर चौगुले, योगेश गाडगे, संदीप थोरात हे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शेतकर्यांना माती परीक्षण व खतांचा संतुलित वापर याविषयी मार्गदर्शन करताना माती परीक्षणासाठी माती नमूना कशाप्रकारे घ्यावा जेणेकरून खत व्यवस्थापन योग्यरितीने करता येईल असे मृदाशास्त्रज्ञ योगेश यादव यांनी सांगितले.
यावेळी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे नारायणगाव शाखेचे व्यवस्थापक लक्ष्मण निलख यांनी कोरोमंडल कंपनीच्या विविध खतांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत साळवे आणि संदरप थोरात यांनी केले.
निमगावसावा येथे माती परीक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव.