शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

बनावट दाखल्यांना आळा घालण्यासाठी जन्म-मृत्यू कार्यालयाकडून बारकोडचा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 11:16 AM

कोरोना आपत्तीमुळे जन्म - मृत्यूचा नोंदणी तपशील येण्यास उशीर होत होता..

ठळक मुद्देमे अखेरपर्यंतच्या नोंदी महापालिकेला प्राप्त

पुणे : कोरोना आपत्तीमुळे विस्कळीत झालेल्या पुणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. तसेच बनावट दाखल्यांना आळा घालण्यासाठी या कार्यालयाने आता जन्म-मृत्यू दाखल्याची प्रत्येक प्रिंट बारकोड असलेल्या कागदावर देण्यास सुरूवात केली आहे.यामुळे विशेषत: जमीन खरेदी विक्री व्यवहारात अथवा नोंदीत बनावट मृत्यू दाखल्यांचा वापर करून होणाऱ्या फसवणुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकणार आहे.

बारकोड असलेली ही स्टेशनरी (कागद) शहरातील पालिकेच्या प्रत्येक नागरी सुविधा केंद्राकडे सुपुर्त करण्यात आली आहे. कुठल्या केंद्राकडे किती स्टेशनरी गेली. त्यापैकी किती दाखले प्रिंटआऊट काढून वितरीत केले व त्या प्रमाणात शुल्क आकारणी झाली का, याचा सर्वकाही तपशील या बारकोडच्या वापरामुळे पालिकेच्या संबंधित खात्याकडे उपलब्ध राहणार आहे. बारकोड असलेल्या कागदांवरच जन्म व मृत्यूचे दाखल देण्याचे कामकाज ४ जून २०२० पासून सुरू करण्यात आले असून, जेवढे दाखले दिले जातील त्या प्रत्येक दाखल्याची नोंद संबंधित कार्यालयाकडे ठेवण्यात येत आहे. तसेच वितरीत करण्यात येणाºया प्रत्येक दाखल्यावर पूर्वी प्रमाणे पालिकेला अधिकृत शिक्काही असणार आहे. 

दरम्यान मृत्यू दाखला देताना त्या दाखल्याच्यावर ठळक लाल अक्षरात मृत्यू-प्रमाणपत्र असा उल्लेख असणार आहे. तर जन्म दाखल्यावर हिरव्या अक्षरात जन्म प्रमाण-पत्र असा उल्लेख राहणार आहे. अशी माहिती जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाच्या प्रमुख तथा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत पूर्वी जन्म मृत्यू कार्यालयाकडून १० मार्च २०१९ पासून प्रत्येक कागद हा नंबरिंग करून क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आला होता. 

नागरी सुविधा केंद्रामार्फत दाखले देण्यास सुरूवात झाल्याने, आता ई-मेल व्दारे मृत्यू दाखले देण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. महापालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयाकडून १ एप्रिलपासून १ जूनपर्यंत २९८ अर्जदारांना ई-मेलव्दारे मृत्यू दाखले (फ्र ी कॉपी) दिले होते, आता ही प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.

--------------

मे अखेरपर्यंतचा जन्म-मृत्यूची आकडेवारी पालिकेला प्राप्त 

कोरोना आपत्तीमुळे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाकडे जन्म-मृत्यूचा तपशील येण्यास उशिर होत होता.मात्र लॉकडाऊन शिथिलतेनंतर हा तपशील कार्यायालकडे आला असून, मेअखेरपर्यंतच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी या कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.सदर दाखले नागरी सुविधा केंद्रामार्फत निर्धारित शुल्क प्रति प्रिंटला आकारून अर्जदाराच्या मागणीनुसार वितरीत करण्यात येणार आहेत. परंतु, सद्यस्थितीला नागरी सुविधा केंद्राकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने हे दाखले वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfraudधोकेबाजी