पुणे - राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये सर्वाधिक अडथळा असतो तो चलनविनियमाचा़ हत्यारे खरेदी, अनैतिक मानवी व्यापार, ड्रग्ज यांच्या तस्करीत वस्तू पुरविल्यानंतर त्याचे पैसे पूर्वी हवालामार्फत दिले जात असत़ त्यात समोरच्या पार्टीची ओळख निप्पन्न होत असे़ पण बिटकॉईनसारखी आभासी चलने सुरू झाली व त्याचा सर्वाधिक वापर अशा व्यवहारांसाठी होऊ लागला आहे़ जेव्हा बिटकॉईन एका खात्यातून (वॉलेट) दुसºया खात्यात वर्ग होतो तेव्हा तो कोणाच्या खात्यात जमा झाला आहे, हे शोधले जाऊ शकत नाही़ यामुळे जगभरातील अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी संघटना शस्त्रखरेदी व ड्रग्ज खरेदीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे़बिटकॉईनसारखी सुमारे ५५० आभासी चलने जगभरात सध्या वापरली जात आहेत़ त्यात सर्वाधिक लोकप्रिय बिटकॉईनच आहे़ सध्या एका बिटकॉईनची किंमत ५ लाख रुपये आहे़ बिटकॉईनची सुरुवात साटोशी नाका मोटो नावाच्या व्यक्तीने केली असल्याचे सांगितले जात़े बिटकॉईन हे कोणत्याही देशाचे चलन नसून ते आॅनलाईन व्यवहारासाठी उपलब्ध असलेले आभासी चलन आहे़ बिटकॉईनवर कोणाचेही नियंत्रण नसते़
अनैतिक व्यवहारासाठी बिटकॉईनचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 2:21 AM