शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

‘तो’ गूळ वापरायोग्य!

By admin | Published: July 14, 2016 12:44 AM

गूळ खाल्ल्यावर एका पदाधिकाऱ्याला करंट लागला... महिला सदस्यांना तरतरी आली... तर एका सदस्याला डोक्यात झटका बसला होता.

पुणे : गूळ खाल्ल्यावर एका पदाधिकाऱ्याला करंट लागला... महिला सदस्यांना तरतरी आली... तर एका सदस्याला डोक्यात झटका बसला होता. मात्र तो गूळ राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा व फूड हायजेनिक व हेल्थ लॅबोरेटरीने दिलेल्या चाचणी अहवालात वापरायोग्य असल्याचे समोर आले आहे. अजून एक अहवाल येणे बाकी आहे.बुधवारी झालेल्या स्थायी समितीत या दोन्ही अहवालांचा अंतरिम अहवाल सादर करण्यात आला.जिल्ह्यातील तब्बल साडेचार हजारपेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना पोषण आहारामध्ये गूळ पावडरचे वाटप करण्यात येते. मात्र, हातभट्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या गुळाचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक बाब गेल्या महिन्यात जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत निदर्र्शनास आणून दिली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी वाटप करण्यात आलेल्या गुळाची चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. या समितीने प्राथमिक पाहणी अहवालात कुठल्याही आरोग्य समस्या मुलांना निार्मण झाल्या नाहीत, तरीही गूळ पावडरचा पुढील वापर प्रयोगशाळेतून अंतिम निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतरच करावा, असे मत मांडले होते. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, फूड हायजिन व हेल्थ लॅबोरेटरी व अन्न व औैषध प्रशासन प्रयोगशाळेत या गुळाचे नमुने पाठविण्यात आले होते. यातील राज्य सार्वजनिक प्रयोगशाळेत बारामतीतील अंजनवाडी, हवेलीतील येवलेवाडी येथील नमुने पाठविण्यात आले होते. यात ८ गुणवत्ता निकष तपासण्यात आले असून, अन्नसुरक्षा व प्रमाणके नियमावली २0११ नुसारच्या मापदंडानुसार योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे. तर फूड हायजिन व हेल्थ लॅबोरेटरीत हवेलीतील येवलेवाडी, बारामतीतील अंजनवाडी व साबळेवाडी येथील नमुने पाठविण्यात आले होते. गूळ पावडरच्या ६ रासायनिक चाचण्यांचे निष्कर्ष मापदंडानुसार योग्य असल्याचे कळविले आहे. (वार्ताहर)