घोडेगाव : उच्च पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवीकाळातील शिक्षकांच्या ज्ञानाचा उपयोग नोकरी व व्यवसायासाठी करून घ्यावा, असे मत घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश नितीन पाटील यांनी व्यक्त केले़ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बी़. डी. काळे महाविद्यालय पदवीग्रहण समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जयसिंगराव काळे हे होते़न्या़ पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील कौटुंबिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे़ आपल्या घरात आपले स्थान काय आहे? आपण काय केले पाहिजे? याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे़ याप्रसंगी प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र इत्यादी विद्या शाखेतील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना विद्यापीठाची प्रमाणपत्रे सन्मानपूर्वक प्रदान केली़ या प्रसंगी न्यायाधीश बी. बी. चव्हाण, वसिम शेख, शारदा प्रबोधिनीचे संस्थापक ह. भ. प. पांडुरंग महाराज येवले, घोडेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़ मुकुंद काळे, सखाराम घोडेकर, अॅड़ संजय आर्विकर, अॅड़ मधुकर सूर्यवंशी, अॅड़ सुदाम मोरडे, अॅड़ प्रकाश शहाणे उपस्थित होते़ प्राचार्य आय़ बी. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर वाल्हेकर, माणिक बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले़ नाथा मोकाटे यांनी आभार मानले़ (वार्ताहर)
शिक्षकांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा : पाटील
By admin | Published: February 16, 2017 2:57 AM