शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पालखीतून थर्माकोल, प्लॅस्टिक हद्दपार, पारंपरिक द्रोण पत्रावळ्यांचा वापर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 1:39 AM

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीहि सुस्वरे आळविती तुका म्हणे होय मानसी संवाद आपुलाची वाद आपणासी या अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने झाली होती.

- प्रशांत ननवरेवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेपक्षीहि सुस्वरे आळवितीतुका म्हणे होय मानसी संवादआपुलाची वाद आपणासीया अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने झाली होती. वरील अभंगाद्वारे तुकोबांनी अधोरेखित केलेले पर्यावरण जपण्याचे केलेले आवाहन दुर्लक्षित करुन चालणार नाही. राज्य शासनाने केलेली प्लॅस्टिकबंदी यंदा संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांनी जपली आहे. दिंड्यांमधुन थर्माकोल, प्लॅस्टिकच्या थाळ्या वाट्यांना मूठमाती देण्यात आली आहे. पारंपरिक द्रोण पत्रावळ्यांचा वापर सुरु सोहळ्यात झाला आहे. याबाबत पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली.सोहळाप्रमुख मोरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ४०० वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांना पर्यावरणाचे महत्व समजले होते. त्यांनी त्यावेळी रचलेल्या अभंगांतून याबाबत माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीचे संस्थानासह वारकरी भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. पावसापासून वापरण्यात येणारा कागद वगळता सोहळ्यात वारकरी भाविकांनी प्लॅस्टिकबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. त्यासाठी जेवण, अल्पोपहार करण्यासाठी वापरात असणारी प्लॅस्टीक आणि थर्माकोलची ताटे पुर्णपणे वापर थांबविण्यात आला आहे. तसेच, सक्षम दिंड्यांमध्ये स्टील ताटे, वाट्यांचा वापर करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पारंपरिक पत्रावळ्यांचा वापर करीत आहेत.संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा ३३३ वा पालखी सोहळा आहे. यावर्षी वारीमध्ये ३३० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. तर ३ .५० ते ३.७५ लाख वारकरी तुकोबारायांच्या पालखी सोहळ््यासोबत चालत आहेत. निर्मल वारी अभियानाचे देखील संस्थानाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाच्या सुविधेमुळे उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण थांबले आहे. प्रत्येक ठीकाणी २५ एकराचा पालखी तळ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व दिंड्या एकत्रित केंद्रीत होण्यास मदत होईल. गेल्या दोन वर्षांपासुन याबाबत पाठपुरावा सुरु आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर, अंथुर्णेसह अकलुजच्या पुढील मुक्कामी असणाऱ्या बोरगांव येथे जागा मिळाल्या आहेत.शासनाकडे मागणी केल्याप्रमाणे प्रत्येक तळावर सगळ्या विभागाचे अधिकारी उपलब्ध आहेत. त्या सर्वांकडे वॉकीटॉकी उपलब्ध आहेत. त्यामुळे जलद गतीने समन्वय साधुन कोणतीली समस्या सोडविण्यास मदत होते. शासनाच्या वतीने सोयीसुविधांबाबत चांगला पाठपुरावा सुरु आहे, असे सोहळा प्रमुख मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीPandharpur Wariपंढरपूर वारी