पुणे : श्रीलंकन विद्यापीठातर्फे समाजोपयोगी उपक्रमांसाठी दिली जाणारी डॉक्टर आॅफ फिलॉसॉफी (सोशल सायन्स) मानद डॉक्टरेट पदवी यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांना प्रदान करण्यात आली आहे. बालकांचे आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा विविध सामाजिक प्रश्नांवर काकडे यांचे सातत्यपूर्ण काम सुरू आहे.श्रीलंकन विद्यापीठाचे भारतातील प्रतिनिधी डॉ. प्रेम सेठी व नेव्हील वाडिया इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चचे संचालक आनंद दडस यांच्या उपस्थितीत उषा काकडे यांचा हा सन्मान करण्यात आला. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख असलेल्या उषा काकडे या यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा आहे. फाउंडेशनने शहरातील रुग्णालयांना एकत्र आणून महापालिकेच्या ३११ शाळांमध्ये दंत आरोग्य प्रकल्प राबविला. या शाळांमधील सुमारे सव्वा लाख विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्यावर फाउंडेशन सध्या काम करीत आहे. महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून काकडे यांच्या संकल्पनेतून ऊर्जा फोरमची स्थापना करण्यात आली. चेंजमेकर्स अभियानांतर्गत विद्यार्थिनींना सुरक्षेचे धडे, सुरक्षा- घरातील व घराबाहेरील, वृक्षारोपण, अनाथ मुलांसाठी ‘एक दिवाळी स्नेहाची’ असे विविध उपक्रम राबविले जातात.
श्रीलंकन विद्यापीठाची उषा काकडे यांना डॉक्टरेट
By admin | Published: August 31, 2016 1:37 AM