‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 08:56 AM2021-09-15T08:56:46+5:302021-09-15T09:20:06+5:30
आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत, कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली
पुणे/मुंबई - भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सतत सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका करत असतात. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुनही त्यांनी मोठा वाद घातला होता. त्यानंतर, आता जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे आभार मानत त्यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केल्याचे दिसून येते.
खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, उद्घाटनादिवशीच अचानक पहाटे गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांमधे झटापटदेखील झाली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीरही केलं. आता, तेथील जमिनीसंदर्भात त्यांनी ट्विट करुन महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत, कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे. ।।यळकोट यळकोट जय मल्हार।।
आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत,कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘#मुळशी_पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे.
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 15, 2021
।।यळकोट यळकोट जय मल्हार।। pic.twitter.com/ACt32JGySh
असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. पडळकर यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र त्यांच्या सातत्याच्या टीकेच्या रोख हा पवार कुटुंबीयांकडे आहे. त्यामुळे, यावेळीही त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केल्याचे दिसून येते.
तेव्हा गुन्हा दाखल
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने जेजुरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला होता.