पुणेकरांना लस द्या: प्रशासन करणार केंद्राकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 02:47 PM2021-03-12T14:47:45+5:302021-03-12T14:47:45+5:30

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अजित पवार यांच्या उपस्थितीत केली मागणी

Vaccinate Punekars: Administration will demand from the Center | पुणेकरांना लस द्या: प्रशासन करणार केंद्राकडे मागणी

पुणेकरांना लस द्या: प्रशासन करणार केंद्राकडे मागणी

Next
ठळक मुद्देलसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु

पुणे: पुण्यात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी. यासाठी आपण केंद्राकडे मागणी करणार असल्याचे पुणे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी जास्त केसेस आहेत त्या सर्वच ठिकाणी लसीकरणासाठी हेच धोरण अवलंबावे. अशी मागणी आपण खासदारांतर्फे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुण्यामध्ये आत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभुमीवर आता ही मागणी करण्यात येत आहे. याबाबतच आज बैठकीत चर्चा करण्यात आली. अजित पवार यांनी याबाबत केंद्राकडुन आणखी लसी मागवाव्यात यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशी भुमिका यावेळी मांडली.

पवार म्हणाले “ बैठकीत चर्चा झाली आहे त्याप्रमाणे परिक्षा घेतली जावी अशी मागणी आपण करणार आहोत. सध्या पार्लमेंट सुरु आहे तर त्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती आम्ही केली आहे. फक्त पुणेच नाही तर इतर ठिकाणी देखील जिथे रुग्ण संख्या जास्त आहे तिथे हे धोरण स्विकारावे अशी आमची भुमिका आहे असे पवार म्हणाले”

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले ,” अपवादात्मक परिस्थिती म्हणून पुण्याचा विचार करण्याची मागणी केंद्राकडे केली जाणार आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. फेब्रुवारीचा ७ पट म्हणजे २१० लसीकरण केंद्रे सुरु केली गेली आहेत. साधारण दिवसाकाठी २३५०० ते २४००० जणांचे लसीकरण होत आहे. हे प्रमाण आणखा वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे”

Web Title: Vaccinate Punekars: Administration will demand from the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.