पुणे : शारीरिक हालचाल करू न शकणाऱ्या व विविध कारणांमुळे अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी महापालिकेकडे आजपर्यंत ७० अर्ज आले आहेत़ यापैकी ४० जण पात्र ठरले असून, यापैकी ९ जणांना मंगळवारी लस देण्यात आली़
शहरात लसीकरण केंद्रावर येऊन लस घेऊ न शकणाऱ्या व ज्या व्यक्ती अंथरुणाला खिळलेल्या आहेत अशा व्यक्तीही लसीकरणापासून वंचित राहू नयेत, यासाठी महापालिकेने घरी जाऊन लस देण्याची मोहीम सुरू केली आहे़ यामध्ये संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी ती व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या लस घेण्यास सक्षम आहे, तसेच ही व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे यासाठीचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रांसहित अर्ज सादर करावे, असे आवाहन महापालिकेने केले होते़ या आवाहनानुसार ई-मेलव्दारे ७० जणांनी मागणी केली असून, यापैकी ४० व्यक्तींसाठीच्या लसीकरणासाठी आवश्यक ती व योग्य प्रमाणपत्रे जोडण्यात आली होती़ त्यानुसार या ४० जणांना लस दिली जाणार असल्याचे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली़
या लसीकरण मोहिमेत लस वाया जाऊ नये म्हणून एकाच विभागातील व्यक्तींची दररोज निवड करून त्यांना घरी जाऊन लस दिली जाणार आहे़ तसेच लस दिल्यानंतर अर्धा तास संबंधित व्यक्तींच्या प्रकृतीवर लक्षही ठेवले जात आहे़ आज कोथरूड परिसरातील ९ जणांना लस याअंतर्गत दिली.
-----------------
इच्छुकांनी येथे संपर्क साधावा
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य अंथरुणावर खिळलेल्या अवस्थेत आहेत, अशांना लस हवी असल्यास सर्व कागदपत्रे व आवश्यक तया प्रमाणपत्रांसह ुी१्रिििील्ल५ंूू्रल्लं३्रङ्मल्ल.स्र४ल्ली@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेलवर पाठवावे. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व्यक्तींना घरी येऊन लस देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही डॉ़ देवकर यांनी सांगितले़