पुणे : राज्यातील लसीकरण मोहिमेत पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून, १० जुलैपर्यंत शहरात २० लाख ३७ हजार १८२ जणांचे लसीकरण झाले आहे़ यापैकी १५ लाख ४६ हजार जणांना लसीचा पहिला डोस तर, ४ लाख ९१ हजार १८२ जणांनी लसीचा दुसरा डोसही देण्यात आला असल्याची माहिती मुख्य लसीकरण अधिकारी तथा महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़वैषाली जाधव यांनी दिली़
शहरात कामानिमित्त बाहेर पडणाºया व घराबाहेर सातत्याने वावर असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे सर्वाधिक लसीकरण झाले असून, यामध्ये ६ लाख ८५ हजार ५८६ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे़ तर २९ हजार ३९ जणांचे लसीचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत़
------------------
शहरातील १० जुलै पर्यंतचे एकूण लसीकरण
वर्ग पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी ६४,९५४५१,२९८
फ्रंट लाईन वर्कर ८५,१०३३९,३९४
ज्येष्ठ नागरिक ३,१८,५६३१,९६,६४६
४५ ते ५९ वयोगट३,९१,७९४१,७४,८०५
१८ ते ४४ वयोगट६़८५,५८६२९,०३९
----------------------------------
शहरातील लसीकरण केंद्रांमध्ये मोठी वाढ
शहरातील ४५४ विविध आरोग्य सुविधा केंद्रांसह १८९ सरकारी व २२५ खाजगी रूग्णालयांव्दारे सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे़ तर ४० खाजगी कंपन्यांच्या ठिकाणीही लसीकरण सुविधा उपलब्ध आहे़ परिणामी शहरातील लसीकरणाने मोठा वेग घेतला असून, आजमितीला शहरातील सर्वच केंद्रांवर लसीचा पहिला डोस व दुसरा डोस १८ वर्षांपुढील सर्वांना उपलब्ध आहे़
खाजगी रूग्णालयांमध्ये लसीकरणास सुरूवात झाल्यापासून म्हणजेच २१ मे पासून १० जुलै या कालावधीत शहरात महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ३ लाख ५५ हजार ५६६ जणांनी, तर खाजगी रूग्णालयात ६ लाख ४२ हजार ४६२ जणांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे़ तसेच महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर २९ हजार ५५६ जणांनी, तर खाजगी रूग्णालयात ३१ हजार ३४८ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे़ तसेच खाजगी रूग्णालयांत उपलब्ध असलेली स्पुटनिक लस ३ हजार २५१ जणांनी घेतली आहे़
दरम्यान शहरातील प्रमुख खाजगी रूग्णालयांमध्ये लसीचा मोठया प्रमाणात साठा असून, काही रूग्णालयांमध्ये लसीचे एक लाखाहून अधिक डोस शिल्लक साठ्यामध्ये आहेत़ त्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागानेही या सर्व खाजगी रूग्णालयांना लसीकरणाचा वेग वाढवून, आपले दैनंदिन स्लॉटची क्षमता दुप्पटीपेक्षा अधिक करण्याच्या सूचना नुकत्याच दिल्या आहेत़
---------------------------