८ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना व सरकारने निर्धारित केलेल्या वीस आजारांपैकी कोणताही आजार असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सुरू आहे. ना एक दिवसाआड देण्यात येणाऱ्या लसीकरणाऐवजी आठवड्यातील सहाही दिवस लस दिली जाणार आहे. आत्तापर्यंत सुमारे १२०२ जणांनी लसीकरण करून घेतले आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद आहिरे व डॉ.जयदीपकुमार कापशीकर यांनी दिली.
लसीकरणासाठी नसरापूर आरोग्य केंद्रात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
लसीकरण मोहीम सुरू असताना नागरिकांना लस घेण्याकरिता नोंदणीची अडचण येत असून लसीकरण पथकाला नोंदणी करावी लागत आहे. त्याकारणाने लसीकरण करताना अडचण येऊन वेळ अपुरा पडतो आहे. याकरिता नागरिकांनी कोविन ॲपला नोंदणी करणे, ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करणे किंवा गावागावांतील तरुणांनी पुढाकार घेतल्यास नोंदणीसाठी लागणारा वाया जाणारा वेळ वाचवून नागरिकांना जास्तीत जास्त लसीकरण करता येऊ शकेल असे वैद्यकीय अधिकारी डॉ मिलिंद अहिरे यांनी सांगितले.
नसरापूरसह बाहेरगावाहून लसीकरण करण्यासाठी त्यांना ने आण करण्यासाठी आरोग्य केंद्राने स्वतंत्र वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे. नसरापूर आरोग्य केंद्रात लसीकरणसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला असला तरी आरोग्य केंद्राची इमारत अपुरी पडत आहे. नसरापूर प्राथमिक आरोग्य येथे कोरोना प्रतिबंध लसीकरण वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद अहिरे व डॉ.जयदीपकुमार कापशीकर यांच्यासह आरोग्य सहायक अनिल नाईक, राजेंद्र मोरे, अप्पासाहेब शिंदे, आरोग्य सेविका मनीषा कांबळे, सोनाली कारकूड या पथकाव्दारे लसीकरण करण्यात येत आहे.
नसरापूर (ता. भोर) : प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकाचे लसीकरण करताना डॉ. मिलिंद अहिरे व आरोग्य पथक.