शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

शहरात दिवसभरात १४ हजार १७९ जणांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोविन अ‍ॅपमध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे काही काळ शहरातील विशेषत: १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोविन अ‍ॅपमध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे काही काळ शहरातील विशेषत: १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण बंद राहिले़ मात्र, दुपारनंतर हा अ‍ॅपमधील गोंधळ निस्तरला गेल्याने, आज शहरात दिवसभरात या वयोगटांतील २ हजार ८० जणांना पाच लसीकरण केंद्रांवर लस घेता आली़ तर, दुसरीकडे शहरातील सर्वच म्हणजे ११४ लसीकरण केंद्रांवर दिवसभरात १४ हजार १७९ लणांनी लस घेतली़

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार : शहरातील ११४ लसीकरण केंद्रांवर आज दिवसभरात ६१ हेल्थ वर्कर यांना पहिला, तर ३६० जणांना लसीचा दुसरा डोस दिला. फ्रंटलाईन वर्करपैकी ४०४ जणांना पहिला व ७८० जणांना दुसरा डोस दिला़ तर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांपैकी ३५१ जणांना पहिला व ६ हजार ३३३ जणांना लसीचा दुसरा डोस दिला आहे़ याचबरोबर ४५ वरील व ५९ वयाच्या आतील ८५९ जणांना लसीचा पहिला व २ हजार ९५१ जणांना दुसरा डोस दिला आहे़

शहरात एक मेपासून १८ ते ४४ वर्षे वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते़ मात्र, पहिल्या दिवशी शहरात कमला नेहरू रुग्णालय व राजीव गांधी रुग्णालय येथे केवळ एकूण मिळून ४६ जणांना लसीकरण होऊ शकले़ दोन दिवसांत यात सुधारणा होऊन कोविन-अ‍ॅपवरील वेळ व उपस्थितीनुसार दिवसाला येथे प्रत्येक ठिकाणी सव्वातीनशेपर्यंत सरासरी लसीकरण झाले़

राज्य शासनाकडून लसीचा साठा उपलब्ध झाल्याने, महापालिकेने मंगळवारी रात्री जाहीर केल्याप्रमाणे बुधवारपासून आणखी तीन ठिकाणी म्हणजे, अण्णासाहेब मगर रुग्णालय हडपसर, लायगुडे रुग्णालय सिंहगड रोड व सुतार दवाखाना कोथरूड येथेही १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण सुरू केले़ या तीनही ठिकाणी कोव्हॅक्सिन डोस दिले गेले़ परंतु, प्रारंभी कोविन अ‍ॅपमध्ये बिघाड झाल्याने, नोंदणी दिसत नसल्याचे नागरिकांना सांगण्यात आले. तरीही कित्येक नागरिकांनी चार तास वाट पाहिली मात्र काही झाले नाही. अखेर अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी लक्ष घातले आणि लसीकरण वितरणाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी हा प्रश्न सोडवला. पण, या सर्व घडामोडीत दुपारचे दीड वाजले आणि त्यानंतर लसीकरण सुरळीत सुरू झाले. अखेर आज सायंकाळपर्यंत १८ ते ४४ वयोगटांतील २ हजार ८० जणांना लसीकरण करण्यात आले आहे़