पुणे : राज्यात पुणे शहराने लसीकरणात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून, २९ जूनपर्यंत शहरात १७ लाख ११ हजार ७३६ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी १३ लाख ३५ हजार ५९५ जणांना लसीचा पहिला डोस तर, ३ लाख ७६ हजार १४१ जणांनी लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे.
शहरात आजमितीला १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे सर्वाधिक लसीकरण झाले असून ५ लाख ३ हजार २७९ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. २० मेनंतर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू झाल्यावर १८ ते ४४ वयोगटातील वर्गाच्या लसीकरणाने वेग घेतला. परिणामी उशिरा सुरू होऊनही या वर्गातील लसीकरण आजमितीला मोठ्या प्रमाणात झाले आहे. सध्या शहरातील २१७ खासगी रुग्णालयांमध्ये तर महापालिकेच्या १८८ लसीकरण केंद्राव्दारे लसीकरण केले जात आहे.
-----------------
१६१ जणांनी घेतली स्पुतनिक लस
शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये स्पुतनिक लस येण्यास सुरुवात झाली असून २४ जूनपासून आजपर्यंत १६१ जणांनी स्पुटनिक लस घेतली आहे. तर शहरात साधारणत: एक लाख जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक व्यक्ती या फ्रंटलाईन वर्कर व हेल्थ वर्कर तथा काही प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आहेत़
२१ मे पासूनच्या नोंदणीनुसार शहरातील महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर २ लाख २७ हजार ८०४ जणांनी, तर खासगी रुग्णालयात ४ लाख ६८ हजार ८०३ जणांनी कोव्हिशिल्ड लस घेतली. तसेच महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर २२ हजार ५१९ जणांनी, तर खाजगी रुग्णालयात १७ हजार ३७९ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.
----------------------------
शहरातील २९ जून पर्यंतचे एकूण लसीकरण
वर्ग पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी ६४,४९४४९,६९१
फ्रंट लाईन वर्कर ८४,१०४३४,९१४
ज्येष्ठ नागरिक ३,११,२५४१,६९,०९५
४५ ते ५९ वयोगट३,७२,४६४१,०४,६५१
१८ ते ४४ वयोगट५,०३,२७९१७,७९०
----------------------------------