सदर लसीकरण कार्यक्रम ग्रामदैवत रोकडेश्वर मंदिराच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. दीपाली कांबळे यांनी लसीकरणाचे योग्य नियोजन केले. त्यामध्ये टोकन पद्धत, महिला व पुरुष वेगळ्या रांगा लावून टोकन प्रमाणे लसीकरण केले. तसेच आशावर्कर्स शुभांगी केसवड व आश्विनी देवकर यांनी पहिला व दुसऱ्या डोसची नोंद वेगवेगळ्या रजिस्टरमध्ये केली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी विजय पावरा व सुनीता कासारे यांनी लसीकरण केले. या प्रसंगी सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भिमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य राजाराम शेळके, नवनाथ भेगडे, निकिता घोगरे, मा. सरपंच बाजीराव धुमाळ शारदा गोडाबे, नितीन भेगडे, कैलास देवकर, किरण शेळके, मयूर घोगरे, पत्रकार साहेबराव भेगडे यांनी नागरिकांना सामाजिक अंतर, ओळींमध्ये उभे राहणे, गडबड न करणे, शांतता राखण्यासाठी आवाहन केले. अशी माहिती डॉ. दीपाली कांबळे यांनी दिली.
घोटवडेत ३५२ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:13 AM