सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सिंबायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित करंजकर आदी उपस्थित होते. सिंबायोसिस रुग्णालयात लस दिलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत व त्याबद्दल कोणतीही तक्रार केली नाही.
डॉ.विजय नटरजन यांनी लस घेतल्यानंतर आपण पूर्णपणे स्वस्थ असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ही सुरक्षित लस असून सर्वांनी ती घ्यावी, असे आवाहन केले.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, तहसीलदार डॉ. अभय चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार,आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ संजय देशमुख यांनी या केंद्राला भेट दिली. तसेच जिल्हाधिकारी देशमुख यांनी लस घेतलेल्या लाभार्थ्यांशी निरीक्षण कक्षात संवाद साधला.