ग्रामीण रुग्णालय कुरूळी येथील लसीकरण ठिकाणची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी केली. या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे, करंजविहिरे वैद्यकीय अधिकारी जयश्री महाजन,कुरुळी वैद्यकीय अधिकारी सारिका लमहाटे, तलाठी दीपक जाधव,ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल, सरपंच , उपसरपंच , सदस्य व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. कुरुळी येथील वैद्यकीय अधिकारी सारिका लमहाटे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की पुढील आदेश येईपर्यंत कुरुळी येथे लसीकरण चालू रहाणार असून नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे .
कुरूळी येथील लसीकरण केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.