शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

लससाठा न आल्याने आजही लसीकरण केंद्र बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:15 AM

पुणे : राज्य शासनाकडून महापालिकेला सोमवारी रात्रीपर्यंत लस उपलब्ध होईल असा अंदाज होता; मात्र आजही लस उपलब्ध न झाल्याने, ...

पुणे : राज्य शासनाकडून महापालिकेला सोमवारी रात्रीपर्यंत लस उपलब्ध होईल असा अंदाज होता; मात्र आजही लस उपलब्ध न झाल्याने, मंगळवार दि. ४ मे रोजीही शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

दरम्यान १८ ते ४४ वयोगटातील वर्गाला महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालय व कमला नेहरू रुग्णालय येथे लसीकरण सुरू राहणार आहे. कोविन अ‍ॅपवर नोंदणी केलेल्यांना व लसीकरणाची विहित वेळ मिळालेल्यांनाच येथे लसीकरण करण्यात येणार आहे. ऐनवेळी आलेल्या व्यक्तींना लसीकरण मात्र उपलब्ध राहणार नाही.

या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ३५० जणांना लसीकरण होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी म्हणजे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी राजीव गांधी रुग्णालयात ‘कोविन अ‍ॅप’वर नोंदणी केलेल्या व नमूद केलेल्या वेळेत आलेल्या केवळ १८ जणांना तर कमला नेहरू रुग्णालयात २८ जणांनाच लसीकरण करण्यात आले. कोविन अ‍ॅपमध्ये नोंदणी करूनही पहिल्या दिवशी अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. दरम्यान ३५० लस प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतानाही कोविन अ‍ॅप नोंदणी बंधनकारक केल्याने इतरांना लस देता आली नाही.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांत १८ ते ४४ वयोगटातील १ हजार ९१ जणांना लसीकरण करण्यात आले असून, २ मे रोजी कमला नेहरू येथे १९४ तर राजीव गांधी रुग्णालय येथे १८६ जणांना तर ३ मे रोजी कमला नेहरू येथे ३३१ जणांना व राजीव गांधी रुग्णालयात ३३४ जणांना लस देण्यात आली.

---------------------------------