लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या पहिल्या डोससाठी ऑनलाईन बुकिंग सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे़ पुणे महापालिकेच्या ६५ केंद्रांवर याकरिता कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे़
कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवस पूर्ण झालेल्यांनाच द्यायच्या या नियमामुळे लाभार्थी संख्या मर्यादित असल्या कारणामुळे, शहरात गुरुवारपासून (दि.२० मे) पुन्हा ४५ वर्षांवरील नागरिकांचे पहिल्या डोसकरिताचे लसीकरण सुरू करण्यात होते़ मात्र लससाठा संपल्याने, शनिवारी शहरात लसीकरण ठप्प झाले होते़ मात्र, शनिवारी रात्री महापालिकेकडे १३ हजार लस प्राप्त झाल्याने, त्यानुसार रविवारी लसीकरण करण्यात आले असून, सोमवारी शहरातील ६५ लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे़
सोमवारी उपलब्ध लसींच्या एकूण साठ्यांपैकी ६० टक्के लस या ऑनलाईन अपॉइन्मेंट/ स्लॉट बुक केलेल्या नागरिकांनाचा त्याही ४५ वर्षांवरील वयोगटासाठी पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहेत़ तर, २० टक्के लसीचे डोस हे ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस ऑनलाईन (केंद्रांवर नोंदणी) पध्दतीने नोंदणी करून देण्यात येणार आहे़ याचबरोबर २० टक्के लस या पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (२४ फेब्रुवारीपूर्वी) घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहणार आहेत़
-------------------