पुणे : शहरात महापालिकेला राज्य शासनाकडून गुरूवारी केवळ दहा हजार डोस प्राप्त झाले. शहरातील १७२ लसीकरण केंद्रांना मागणीप्रमाणे लस पुरविणे महापालिकेच्या आरोग्य विभागालाही शक्य झाले नाही़ परिणामी शहरातील ४० टक्क्यांहून अधिक लसीकरण केंद्र ही दुपारी बारा एक वाजल्यापासून बंद केली़
पुणे शहरात १७२ केंद्रांच्या माध्यमातून दिवसाला आजमितीला सरासरी १८ ते २० हजार जणांना लस दिली जाते. यामध्ये १० टक्के लस ही कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस आहे. या लसीचा साठा महापालिकेकडे आहे. परंतु, नित्याने दिली जाणारी कोविशिल्ड लस मागणीनुसार प्राप्त होत नसल्याने महापालिका यंत्रणा हतबल झाली आहे़ आज महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरही दुपारी बारानंतर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच जावे लागले आहे़ दरम्यान महापालिकेने मागणी करूनही रात्री उशिरापर्यंत लस महापालिकेला मिळालेली नव्हती़