या वेळी सुजाता पवार म्हणाल्या की, पुणे जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींना कोविड- १९ या साथरोगाच्या अनुषंगाने लसीकरण मोहीम सोमवारी दि. १४ जून रोजी मांडवगण फराटा येथे आयोजित केली असून सदर लसीकरणाचा परिसरातील दिव्यांग व्यक्तींनी त्याचा लाभ घ्यावा.
केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडील निर्देशानुसार कोविड १९ साथरोग प्रतिबंधात्मक उपाय दिव्यांग नागरिकांना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मांडवगण फराटा आरोग्य केंद्राअंतर्गत प्राप्त अहवालानुसार एकूण १२६ व्यक्ती ४५ वर्षांपुढील दिव्यांग व्यक्ती असून त्यापैकी ६५ जणांनी लसीकरण करून घेतले आहे. ज्या व्यक्तीचे लसीकरण करावयाचे राहिले असतील याबाबतचे नियोजन करून ग्रामपंचायत स्तरावरील याद्यानुसार हे लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्ती वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजूषा सातपुते व आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
लसीकरणासाठी दिव्यांग व्यक्तींना ने-आण करण्यासाठी राव लक्ष्मी फाऊंडेशनकडून रुग्णवाहिका उपलब्ध केली जाणार आहे. या वेळी घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, दत्तात्रय फराटे, सरपंच शिवाजी कदम, प्रहार अपंग संघटनेचे शिरुर तालुका अध्यक्ष शरद जाधव, रूपाली ढवळे, दिव्यांग नागरिक उपस्थित होते.