पुणे : श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्यावतीने दिव्यांग, अनाथ तरुणांचे लसीकरण करण्यात आले. या शिबिराचा लाभ २७१ जणांनी घेतला. विशेष मुलांच्या २३ संस्थांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे आधार कार्ड नसलेल्या १० अनाथ मुलांचे लसीकरणही केले.
या उपक्रमासाठी हिन्कल इंडिया लिमिटेड, सेवा आरोग्य फाउंडेशन यांनीही सहकार्य केले. या वेळी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम तसेच सुब्बारामन, डॉ. वैशाली जाधव, संजीव बेंद्रे, संभाजी भाग संघचालक अनिल व्यास, सुधीर जवळेकर, महेंद्र अनासपुरे, नगरसेविका छाया मारणे, रमेश पायगुडे, भूपेश सिंग, संध्या केडिया, अजय डिंबळे, उल्का मोकासदार, अनिता तलाठी, रवींद्र जोशी, कल्पना वर्पे, प्रशांत उंदरे, आनंद लोंढे, दीपक अष्टपुत्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आयोजक प्राचार्य डॉ. राजेंद्र खेडेकर यांच्यंसह ʻहेन्कलʼचे डॉ. प्रसाद खंडागळे, रवी ननावरे, विकास माने यांनी सहकार्य केले.
ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात कोरोना काळातील कार्य उल्लेखनीय आणि माणुसकीचे दर्शन घडवणारे आहे, असे प्रतिपादन उपायुक्त कदम यांनी केले. दिव्यांगांच्या लसीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.