घरात शक्य नसेल तर लसीकरणासाठी दिव्यांग व्यक्तींची ने-आण करण्याची जबाबदारी डिकाईने घेतली आहे. शिवाजीनगर येथील श्री रोकडोबा मंदिर देवस्थान येथे मोफत लसीकरण संकल्प कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर, रघुनाथ येमूल, उद्योजक श्रीकांत बडवे, दानेश शहा, प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या उपस्थित पार पडला. या वेळी दिव्यांगांना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात ‘रोजी आणि रोटी’ या दोन्ही आघाड्यांवर सर्वाधिक हाल दिव्यांगांचे झाले. या वेळी डिकाईने मास्कनिर्मितीद्वारे दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच फूड बँकेच्या माध्यमातून संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळामध्ये दिव्यांग, अनाथ, रुग्ण व त्यांचे नातेवाईक, वृद्ध, गरीब व गरजू लोकांना दररोज एक वेळचे प्रसादम (फूड पॅकेट्स) चे वाटपाद्वारे एक लाख अन्न पाकिटे वाटण्याचा टप्पा पूर्ण केला. तसेच गरजू, गोरगरीब आणि दिव्यांगांना अन्न सुरक्षेची हमी मिळावी, म्हणून येमूल प्रयत्नशील आहेत.
फोटो ओळ - डिक्काई व बडवे इंडस्ट्रीज यांच्या दिव्यांगांना घरपोच लसीकरण उपक्रमाच्या संकल्पप्रसंगी दिव्यांगांना धान्य किटचे वाटप करताना भाजपचे शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर, ध्यानगुरू रघुनाथ येमुल गुरुजी, उद्योजक श्रीकांत बडवे, दानेशजी शहा, प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे व इतर.