पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील ३२ ठिकाणी लसीकरण सध्या सुरु आहे. मात्र, नियमित लसीचा पुरवठा होत नसल्याने काही उपकेंद्रांवर आठवड्यातून दोन दिवस तर काही केंद्रावर कमी जास्त प्रमाणात लसीकरण करण्याची कसरत आरोग्य विभागाकडून केली जाते.
पाच प्राथमीक आरोग्य केंद्र, २५ उपकेंद्र व २ ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केले जाते. ६० वर्षा वरील २१ हजार १३० उद्दिष्ठ असलेल्यांपैकी पहिला डोस १५ हजार २९९ ज्येष्ठांनी घेतला, तर ६०२ ज्येष्ठांनी दुसरी लस घेतली. ५ हजार ६०३ ज्येष्ठांना लस देणे बाकी आहे. ४५ ते ५९ वयादरम्यानचा २४ हजार ६५२ व्यक्तींचे लसीकरण करणाचे उद्दिष्ठ होते, पैकी ११ हजार ९८९ व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला असून, ३१५ व्यक्तींनी दुसार डोस घेतला आहे. १२ हजार ६६३ व्यक्तींचे लसीकरण आज ही बाकी असल्याचे पुंरदर पंचायत समितीच्या आरोग्य विभागा कडून सांगण्यात आले.
पुरंदर तालुक्यात सर्वसाधारण ३ हजार लसींचा पुरवठा केला जातो. मात्रा नियमीत लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही उपकेंद्रांवर आठवड्यातून दोन दिवस तर काही केंद्रावर कमी जास्त प्रमाणात लसिकरण करण्याची कसरत आरोग्य विभागाकडून केली जाते. आरोग्य केंद्रांच्या परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने सावली साठी मंडप टाकले असून ग्रामपंचायतीचे कर्मचारी ऑनलाईन नोंदणीसाठी सहकार्य करत आहेत.