लसीकरण रिहे गावातच व्हावे, यासाठी नागरिकांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कारंजकर यांच्याकडे मागणी केली. कारण रिहे आंधळे खोऱ्यात ६ गावे व वाड्या-वस्त्या असून माण व घोटवडे येथे लसीकरणास लॉकडाऊन काळात जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था नव्हती गट विकास अधिकारी यांनी परिसरातील नागरिकांची गैरसोय पाहून रिहेत लसीकरण सुरू केल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त केले.
यावेळी मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर व जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर,आरोग्य अधिकारी डॉ कारंजकर, उपकेंद्राच्या डॉ. अंजली, राऊत, अनिल मोरे, सरपंच भूषण बोडके, उपसरपंच नवनाथ ओझरकर, ग्रामपंचायत सदस्य शेखर शिंदे, अविनाश खेंगरे, मेहुल पडाळघरे, आदिनाथ वाघ, धनंजय बोडके, प्रवीण पडाळघरे, माऊली पडाळघरे साहेबराव पडाळघरे, प्रमोद शिंदे, किरण शिंदे, विजय खेंगरे, कमलेश ओझरकर, ग्रामसेविक सारीका टाकळकर, अनिल मोरे उपस्थित होते.
--
२४ घोटवडे साडेपाचशे नागरिकांचे लसीकरण