तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तळेगाव ढमढेरे, सणसवाडी, शिक्रापूर,निमगाव म्हाळुंगी,पारोडी या पाच केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू असून आत्तापर्यंत ३ हजार ६५० नागरिकांना लसीकरण करण्यात आली. मात्र पुढील नागरिकांना केवळ लस शिल्लक नसल्यामुळे लसीकरण करण्यात आले नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले.
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, पारोडी, निमगाव म्हाळुंगी, कोंढापुरी,शिक्रापूर ही सहा उपकेंद्र असून या उपकेंद्र अंतर्गत तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, टाकळी भिमा,निमगाव म्हाळुंगी, कासारी, कोंढापुरी, बुरुंजवाडी, शिक्रापूर, सणसवाडी दरेकरवाडी, कोरेगाव-भीमा, वाडा पुनर्वसन, डिंग्रजवाडी, धानोरे या सोळा गावांचा समावेश आहे.
या १६ गावांमध्ये एकूण कुटुंबसंख्या ३२ हजार २९६ आहे. तर लोकसंख्या १ लाख २ हजार ४८८ आहे. आज पाच ठिकाणचे लसीकरण केंद्र बंद असल्याने दूरवरून उन्हातानात आलेल्या नागरिकांना लस न घेताच आपल्या घरी परतावे लागले. बुधवार व गुरुवारी या दोन दिवशी दुपारीच लस संपली तर आज शुक्रवार लस उपलब्ध नसल्याने दिवसभर लसीकरण झालेच नाही त्यामुळे सलग तीन दिवस नागरिकांचे कडाक्याच्या उन्हात हाल झाले.
विशेषता ठिकठिकाणच्या गावच्या नागरिकांची कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून नागरिकांमध्ये सामाजिक अंतर राहत नाही.
सध्या तळेगाव ढमढेरे येथे कोरोना बाधितांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी आरोग्य विभागास कर्मचारी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
--
चौकट
--
जिल्ह्यातील कोणत्याच प्राथमिक आरोग्य केंद्रास आज शुक्रवार रोजी लस उपलब्ध झालेली नाही. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सभापती प्रमोद काकडे व तालुका आरोग्य अधिकारी दामोदर मोरे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सांगितले की, सोमवारपासून नियमित लसीकरण चालू होईल.
- रेखाताई बांदल,सदस्य,जिल्हा परिषद,पुणे.
--
फोटो क्रमांक : ०९ तळेगाव ढमढेरे लसीकरण केंद्र
फोटो ओळ: तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावर असलेला शुकशुकाट.