चाकणमध्ये १९ मे रोजी दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे ६० डोस, तर कोविशिल्डचे शंभर डोस आले होते. परंतु त्यापैकी फक्त कोव्हॅक्सिनचे ३५ ते ४० डोस वय वर्षे ४५ वरील दुसरा डोस सर्वसामान्य नागरिकांना देऊन लसीकरण करण्यात आले. तर, कोविशिल्डचे डोस दुसऱ्या डोससाठीचे नवीन नियमाप्रमाणे ८४ दिवस झालेले व वय वर्षे ४५च्या पुढील लाभार्थी न मिळाल्यामुळे डोस शिल्लक राहिले, अशीच परिस्थिती सर्व तालुक्यातील लसीकरण केंद्रात आहे. त्यामुळे कोविशिल्डचे सुमारे आठशे डोस ( दुसऱ्या डोससाठीचे ) १९ मेपासून अद्यापपर्यंत पडून आहेत. याबाबतीत योग्य कार्यवाही करावी अशी मागणी दुर्गाई प्रतिष्ठानचे राजेंद्र शिंदे व किशोर जगनाडे यांनी केली आहे.
वैद्यकीय अधीक्षकांना समक्ष भेटून व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून ४५ वरील ज्यांचा पहिला डोस राहिला आहे, त्यांना हे शिल्लक राहिलेले डोस वापरावे अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला तसे काही निर्देश आलेले नाहीत, त्यामुळे हे डोस पहिल्या डोससाठी वापरू शकत नाही असे उत्तर संबधित अधिकारी देत असल्याने डोसच्या उपलब्धतेवर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
दरम्यान, काही वृत्तपत्रांतून पुणे शहरात १९ तारखेपासून कोविशिल्डचे डोस हे ४५ वरील वयाच्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी वापरण्यास सुरुवात केली आहे असे वृत्त आले असल्याने ग्रामीण भागात लसीकरणाअभावी नागरिकांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची वाट पहात लसीकरण ठप्प आहे. आठशे डोसचे करायचे काय ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?असा प्रश्न उपस्थित झाला आहे . जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य व केंद्र प्रशासनाने यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी खेड तालुक्यातील विविध संस्था व नागरिकांनी केली आहे .
यासंदर्भात, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. बळीराम गाढवे यांनी उपलब्ध डोस पहिले लसीकरण करण्यासाठी वापरण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली असल्याचे सांगितले.