कोविड-१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस परिसरात वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या आदेशानुसार, खेड-शिवापूर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसहित ४५ वर्षे पूर्ण झालेल्या व त्यांना दुर्धर आजाराने वेढलेल्या नागरिकांना प्रथमतः लस देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. शिवापूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास २० गावे येत आहेत. त्या अनुषंगाने ४५ वर्षे पूर्ण व जेष्ठ नागरिकांना कोविड लस देणे आवश्यक असल्याने सोमवार दि.८ मार्चपासून लस देणे सुरू आहे. मागील आठ दिवसांत या भागातील सुमारे २२२ (दोनशे बावीस) नागरिकांना किंबहुना त्या संख्येपेक्षा जास्त नागरिकांना कोविड लस देण्यात आली असून हा उपक्रम पुढे राबविण्यात येणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवापूर गावातील सरपंच सतीश दिघे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश दिघे, भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष राजेंद्र दिघे, उपसरपंच मेघा दिघे, सदस्य राजू सट्टे, अॅड. मोनिका चांडगे, मा. उपसरपंच अण्णा दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.