पुणे : राज्य शासनाकडून गुरुवारी पुणे महापालिकेला लसीचा पुरवठा न झाल्याने, शुक्रवार २१ मे रोजी शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार आहेत. महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या साडेसात हजार लसीच्या पुरवठ्यामुळे, पुणे महापालिकेकडून बुधवारी लसीकरण सुरू करण्यात आले़ मात्र या दिवशी ८४ दिवसांच्या नियमामुळे अनेकांना लस घेता आली नाही़ परिणामी महापालिकेकडे बुधवारी सायंकाळी सुमारे ६ हजार ५६५ डोस शिल्लक राहिले होते़ यामुळे गुरुवारी शहरातील मोजक्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता़
यानुसार आज दिवसभरात ४ हजार ५७९ जणांना लस देण्यात आली़ यामधील लाभार्थ्यांमध्ये पहिल्या डोसचे १६९ तर दुसऱ्या डोसचे ५० आरोग्यसेवक, पहिल्या डोसचे २११ तर दुसऱ्या डोसचे १२० फ्रंटलाईन वर्कर, पहिल्या डोसचे ९७२ तर दुस-या डोसचे ५५६ ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आह़े़ याचबरोबर ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये २ हजार ११९ जणांना पहिला डोस व ३८२ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे़
-------------------
लसीकरण सुरू झाल्यापासून दिलेल्या लस
पहिला डोस दुसरा डोस
१़ आरोग्य सेवक ५९,२४७४५,९६१
२़ फ्रंटलाइन वर्कर६७,७५३२४,८४२
३़ ६० वर्षांवरील नागरिक२,७४,४९७१,२९,८९७
४़ ४५ ते ५९ वयोगट२,७९,३०७५१,५२९
५़ १८ ते ४४ वयोगट१८,५०८
-----------------------------------