लस घेण्यासाठी प्रवृत केले
लसीकरणासाठी आलेल्या जेष्ठांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ग्रामपंचायत व जेष्ठ नागरिक संघ ओतूर यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात मंडप टाकून बसण्यासाठी खुर्च्या व्यवस्था करण्यात आली आहे. अतीवृध्द व अपंगांना तळमजल्यावर लसीकरण करण्याची व्यवस्था केली आहे.
या लसीकरण स्थळी जि. प. सदस्य मोहित ढमाले, पं. स. सभापती विशाल तांबे सरपंच गीता पानसरे उपसरपंच प्रेमानंद पानसरे सर्व ग्रामपंचायत सदस्य भेटी देत आहेत व आपुलकीने चौकशी करीत आहेत.
किती ही गर्दी झाली तरी आरोग्य कर्मचारी परिचारिका जेष्ठांना लस देण्यासाठी कार्यरत आहेत. लस दिल्यावर त्यावरील गोळ्या पण दिल्या जात आहेत. या लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ सारोक्ते, डॉ. यादव शेखरे आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहे
ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण कामी ग्रामपंचायत व ओतूर जेष्ठ नागरिक संघाचे उत्तम सहकार्याने हे लसीकरण सुरू आहे..