नीरा गावात १०० टक्के लसीकरण व्हावे यासाठी नागरिकांसह आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. मात्र नेहमीच डोंबारी, मांगगारूडी व कातकरी समाजातील अशिक्षित नागरिक निरुत्साही असतात. काबाडकष्ट करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. त्यामुळे ते शासनाच्या अनेक योजनांपासून दुर्लक्षित आहेत. तसेच कोरोना प्रतिबंधित लसीविषयी या नागरिकांमध्ये भीती असल्याने लसीकरणापासूनही हा समाज वंचित राहिला होता. त्यामुळे या समाजातील नागरिकांमध्ये जनजागृती करून लसीकरण करणे गरजेचे होते. त्यानुसार डोंबारी वस्तीतील १८ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ६६ नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला.
यावेळी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय म्हवाण, आरोग्य सहायक बाळासाहेब भंडलकर, आरोग्यसेविका शुभांगी चव्हाण, सत्वशीला बंडगर, आशासेविका स्वाती मोरे, सचिन ननावरे, अमित चव्हाण यांच्या टीमने लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेतले.
--
फोटोओळ : नीरा (ता. पुरंदर) येथील प्रभाग एकमधील गोपाळ वस्तीतील लोकांना समाजमंंदिरात लसीकरण करताना आरोग्य अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी.