मुळशी तालुक्यातील मुठा या ठिकाणी असलेल्या मुठा आरोग्य केंद्रामध्ये लस देण्याचे काम सुरू असून यामध्ये खेड्यापाड्यातील नागरिकांना सहकार्य करण्याच्या अनुषंगाने मुळशी शिवसेना तालुका संघटक अमित कुढले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.तेव्हा या मोहिमेचा फायदा हा सर्वच नागरिकांना चांगल्या प्रकार होत आहे.
या मोहिमेबरोबरच पुणे जिल्हा परीषदेचे सदस्य सागर काटकर यांच्याकडून या भागातील नागरिकांना मास्कचे देखील वाटप करण्यात आले.तेव्हा हे वाटप शिवसेनेचे पुणे उपजिल्हासंघटक सचिन दगडे,उपतालुकाप्रमुख शिवाजी उभे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी माजी सरपंच महादेव मरगळे,सतोंष मरगळे,दत्ता झोरे,उपसरंपच शशिकांत पासलकर,अशोक पासलकर,उपसंरपंच सचीन मरगळे,अमित मारणे,विजय मारणे,भरण उभे,वंसत उभे विजय मोगल,लक्ष्मण मरगळे,समीर शिंदे,रमेश पवार,चद्रकातं दबडे व पोपट पासलकर हे उपस्थित होते.तर यामध्ये मुठा खोऱ्यातील साईव, तव,आंदगाव,कोळावडे,लव्हार्डे,टेमघर या गावातील नागरिकांना या मास्कचे वाटप करण्यात आले.
फोटो ओळ : लस नोंदणी मोहिमेमध्ये सहभागी असलेले शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.