वाघोली येथील लसीकरण केंद्रावर शनिवार पर्यंत ३४८९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यातील ६९० नागरिकांचे दोन डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. वाघोली सह अन्य गावातील नागरिकही लसीकरणासाठी वाघोली केंद्रावर येतात. वाघोलीत कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३२४७ झाला आहे. त्यापैकी ३०६९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १४७ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. १ मार्च पासून दररोज कोरोना रुग्णात दोन आकडी संख्येने वाढ होत आहे. बरे होणाऱ्यांची टक्केवारी ९५ टक्के आहे. वाढत्या कोरोनामुळे केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. तर प्राथमिक माहिती नुसार वाघोली प्राथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या पाच गावात एकूण साडे सतरा हजार लाभार्थी आहेत. त्यातील अकरा हजार लाभार्थी हे जेष्ठ नागरिक आहेत. लसीचा तुटवडा होऊ देऊ नये तसेच त्वरित लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
***************
वरिष्ठ पातळीवरून लसीचा तुटवडा जाणवत आहे. आज संध्याकाळ पर्यंत लस उपलब्ध होईल. उद्यापासून नियमित लसीकरण केले जाईल.
-डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी.