पुणे : महापालिकेच्या १८९ केंद्रांवर शनिवारी (दि. २६) लसीकरण केले जाणार आहे. १७३ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार असून, यातील ५७ केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी ३० टक्के कोव्हिशिल्ड लस आॅनलाइन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहेत. तर, ३० टक्के लस हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांना दिली जाणार आहे.
लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ८ वाजता आॅनलाइन स्लॉट ओपन होणार आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या साठ्यापैकी २० टक्के लस ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी (३ एप्रिलपूर्वी) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दिली जाणार आहे. तसेच उर्वरित २० टक्के लस ही हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना आॅन दी स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे़
ज्या नागरिकांनी २८ मे पूर्वी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना शनिवारी १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे.
-----
१८ ते ४४ वयोगटासाठी ५७ केंद्रे
१८ ते ४४ या वयोगटासाठी एकूण ५७ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. लसींच्या उपलब्ध साठ्यांपैकी ७० टक्के लस ऑनलाइन बुकिंग केलेल्यांना देण्यात येणार आहे. तर, ३० टक्के लस ही जागेवर नोंदणी करून दिली जाणार आहे.