शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Vadgaonsheri vidhan sabha assembly election result 2024 : वडगावशेरीत सुनील टिंगरे आघाडीवर, दुसऱ्या फेरीनंतर २४६२ मतांचे लीड 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:00 AM

Vadgaonsheri vidhan sabha assembly election result 2024 : वडगावशेरीत सुनील टिंगरे आघाडीवर, दुसऱ्या फेरीनंतर २४६२ मतांचे लीड 

Vadgaonsheri vidhan sabha assembly election result 2024 : पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये थेट सामना पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि शरद पवार गटाचे बाप्पूसाहेब पठारे यांच्यातील लढतीने मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले होते.

इथे क्लिक करा >महाराष्ट्र विधानसभा निकाल  २ ० २ ४ 

आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सुनील टिंगरे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. पहिल्या फेरीत टिंगरे यांनी ८०१ मतांची आघाडी घेतली, तर दुसऱ्या फेरीत ती वाढवत २४६२ मतांवर नेली आहे. आतापर्यंतच्या एकूण मतमोजणीनुसार, सुनील टिंगरे यांना १३,१२४ मते मिळाली असून बाप्पूसाहेब पठारे यांना १०,८२२ मते मिळाली आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यंदा पक्षामध्ये उभी फूट पडल्याने त्यांना कठीण आव्हानाचा सामना करावा लागत आहे. अशातच पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये लीड घेतल्याने  टिंगरे यांच्या आघाडीने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे.

वडगावशेरी मतदारसंघ हा पुण्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. येथे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत लागल्याने चुरस अधिकच वाढली आहे.

सध्या मतमोजणी प्रक्रियेचा वेग वाढला असून लवकरच पुढील फेऱ्यांचे निकाल हाती येतील. वडगावशेरीचा गड कोण जिंकतो, हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार