लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राहुल वारे (६/२८ व २/३), अॅलन रॉड्रिक्स (७/२५) यांच्या भेदक गोलंदाजीनंतर यश क्षीरसागर (२२०) व किरण मोरे (नाबाद २००) यांच्या दमादार फलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी संघाने महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित १९ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत देवधर ट्रस्टचा एक डाव व ३५५ धावांनी दणदणीत पराभव केला. दुसरीकडे, सोलापूरने सांगली संघाचा एक डाव आणि ७३ धावांनी पराभव केला. डेक्कन जिमखान्याच्या मैदानावर व्हेरॉकविरुद्ध देवधर ट्रस्टचा पहिला डाव ७७ धावांत आटोपला. देवधर ट्रस्टकडून सौरभ दरेकरने २५ धावा केल्या. व्हेरॉककडून राहुल वारे याने २८ धावांत ६ गडी बाद केले. प्रत्युत्तरात यश क्षीरसागरच्या २२० आणि किरण मोरे याच्या नाबाद २०० धावांच्या बळावर व्हेरॉकने ८५.१ षटकांत ३ बाद ५०३ या धावसंख्येवर त्यांचा पहिला डाव घोषित केला. त्यानंतर देवधर ट्रस्टचा दुसरा डाव अवघ्या ७१ धावांत गुंडाळताना शानदार विजय मिळविला. देवधर ट्रस्टकडून दुसऱ्या डावात कमलेश चौगुलेने एकाकी झुंज देत ४० धावा केल्या. व्हेरॉककडून अॅलन रॉड्रिग्जने २५ धावांत ७ व राहुल वारेने ३ धावांत २ गडी बाद केले. पीवायसीच्या मैदानावर पीडीसीए व युनायटेड लढत अनिर्णीत राहिली. पीडीसीएने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २४७ धावा केल्या. त्यांच्या अदिल अन्सारीने ८५ चेंडूंत ९६, दीपक डांगीने ३६ व यश देशमुखने ३३ धावांचे योगदान दिले. युनायटेड एस.सी. संघाकडून अथर्व पाटीलने ८० धावांत ६ व शुभम तिवारीने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात युनायटेड संघाने पहिल्या डावात सर्व बाद २०३ धावा केल्या. त्यांच्याकडून श्रीराम एम. याने सर्वाधिक ४५ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : देवधर ट्रस्ट (पहिला डाव) : ३२.४ षटकांत ७७. (सौरभ दरेकर २५, राहुल वारे ६/२५). दुसरा डाव : १८.१ षटकांत ७१. (कमलेश चौगुले ४०, अॅलन रॉड्रिग्ज ७/२५, राहुल वारे २/३). पराभूत विरुद्ध व्हेरॉक पहिला डाव : ८५.१ षटकांत ३ बाद ५०३. (यश क्षीरसागर २२०, किरण मोरे नाबाद २००.); सांगली (पहिला डाव) : ४८. (योगेश डोंगरे नाबाद २५, शिरीष अकलूजकर ५/२१, प्रीतेश तिवारी ५/२०). दुसरा डाव : ११७. (झिशान ४४, ३०, प्रीतेश तिवारी ६/२१); सोलापूर (पहिला डाव) : २३८. (शिरीष अकलूजकर ५५, सनत मलगे ४४, सचिन माळी ५/५५, योगेश डोंगरे २/५९); पीडीसीए (पहिला डाव) २४७. (अदील अन्सारी ९६, अथर्व पाटील ६/८०). दुसरा डाव : ३ बाद ७२. (दीपक डंगी ४८). अनिर्णीत वि. युनायटेड एस.सी. २०३. (श्रीराम महाशिखरे ४५, मुदस्सर पानसरे ३/३४); क्लब आॅफ महाराष्ट्र (पहिला डाव) : २२६. (अनुराग मोहिते ५२, शुभम शुक्ला ५/४६). दुसरा डाव : ४ बाद १३३. (अनुराग मोहिते ६६, शुभम शुक्ला ३/६०). अनिर्णीत वि. एमसीव्हीएस (पहिला डाव) : २३३. (तुषार चाटे ६३, मोहित यादव ६३, वैभव गोसावी ५/४६).
व्हेरॉकची देवधर ट्रस्टवर मात
By admin | Published: May 06, 2017 2:15 AM