खोर ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्य संख्या पैकी ८ सदस्य आमदार राहुल कुल गटाचे तर माजी आमदार रमेश थोरात गटाचे ३ सदस्य हे निवडून आले होते. यावेळी खोर ग्रामपंचायतीवर राहुल कुल गटाचा झेंडा हा प्रस्थापित झाला होता. मात्र खोरला सरपंच पदासाठी अनुसूचित जातीतील महिलेचे आरक्षण जाहीर झाले. कुल गटाकडे आरक्षित झालेले अनुसूचित जातीतील महिला नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. आरक्षण निघालेल्या अनुसूचित जातीतील महिला या राष्ट्रवादीकडून निवडून आल्या असल्याने खोर ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीकडून वैशाली अडसुळ या बिनविरोध सरपंच निवडून आल्या आहेत.
आमदार राहुल कुल गटाचे पोपट चौधरी हे उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भानुदास येडे यांनी कामकाज पाहिले.
११ खोर
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.