देवीच्या मूर्तीवर मोठ्या प्रमाणावर शेंदूराचा थर साचला होता. त्यामुळे मूर्तीला तडे गेले होते. डेक्कन येथील पुरातत्त्व विभागाचे बालाजी गाजुल यांनी मंदिराची व मूर्तीची पाहणी केली. त्यांनी हे ४०० वर्षांपूर्वीचे मंदिर असल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी मूर्तीच्या अंगावरील ७० ते ८० किलो शेंदूर काढला. त्यामध्ये दीड फुटांचा देवीचा मुखवटा सापडला. नवीन मूर्ती पुण्यातील कारागीर उमेश पवार याने थ्रीडी लेन्समध्ये बनवली. या वेळी उपसरपंच संदीप खळदकर व पोपट लव्हे म्हणाले की, रासाईदेवीच्या मूर्तीला मूळ रूप देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. लवकरच मंदिराचे सुशोभीकरणाचे काम हाती येणार आहे. ग्रामस्थांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
रासाईदेवीचे मानकरी भीमा पाटसचे संचालक विकास शेलार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या वेळी वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार, नानगावच्या सरपंच स्वप्नाली शेलार, विकास खळदकर, सचिन शेलार, माऊली खळदकर, विष्णू खराडे, गुरव संजय गायकवाड, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
०४ केडगाव
नानगाव तालुका दौंड येथील वज्रलेप दिलेली रासाईदेवीची मूर्ती.