ज्ञानेश्वर भंडारेपिंपरी :व्हॅलेंटाईन वीकमधील (walentine week) दुसरा दिवस म्हणजेच 'प्रपोज डे' असतो. प्रेम करणाऱ्याने त्या प्रेमाची कबुली खास पद्धतीने द्यावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे चित्रपट जगतातही प्रपोजला वेगळे स्थान आहे. कालांतराने ऑनलाईन युगात प्रपोजची स्टाईल' बदलली, मात्र प्रेम आजही तेच आहे. प्रेमपत्राची जागा आता मेसेजने घेतली आहे. ((rose day propose day chocolate day teddy day promise day hug day kiss day))
व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली असून, तरुणाई सज्ज झाली आहे. सात दिवस हा प्रेमाचा उत्सव सुरू राहणार आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे असे सर्व दिवस साजरे होणार आहेत. प्रेमीयुगुलांसाठी फेब्रुवारी महिन्याला महत्त्व आहे. या महिन्यातच वयाने आणि मनाने तरुण असलेले लोक व्हॅलेंटाईन वीक साजरा करतात.
या दिवसाची अनेक जण मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रपोजचा दिवस हा गुलाबी दिवस असतो. प्रपोजनंतरच व्हॅलेंटाईन वीक बहरतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सोशल मीडिया प्रभावी
सध्या डिजिटलमुळे सगळं सोप्प झालं आहे. मोबाईल नंबर असला की मेसेज करायला सोप्प होऊन जातं. आता मुले आणि मुलीदेखील टेक्नोसॅव्ही झाल्या आहेत. त्यामुळे इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट आदी ऍप्समुळे एकमेकांच्या संपर्कात राहणं सुलभ झाले आहे. प्रेमपत्र ही गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे, अशी प्रतिक्रिया एका तरुणाने दिली.
मोबाईलवर फिल्मी डायलॉग
आपल्या आवडत्या व्यक्तीला हटके पद्धतीने प्रपोज करावे, असे प्रत्येकाला वाटते. पूर्वी प्रेमपत्र, तसेच गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करीत होते. मात्र, आता यांत्रिक युगात प्रेमपत्राची जागा मेसेज'ने घेतली आहे. त्यामुळे प्रपोज डेच्या दिवशी मोबाईलवर फिल्मी डायलॉगचा भडिमार राहणार आहे. दुसरीकडे, गिफ्ट महाग झाल्याने प्रियकरांच्या खिशाला कान्री बसणार आहे. जर काही वेगळ्या पद्धतीने प्रपोज केले, तर मग यश मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रेमाची कबुली देण्याचे विविध फंडे प्रियकर अवलंबतात.