लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोला बुधवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात धुराचे मोठमोठे लोट निघत होते. नगर परिषदेने वरसोली येथील जागेत अत्याधुनिक पद्धतीने कचरा डेपो विकसित केला आहे. या ठिकाणी बायोगॅस प्रकल्प, तसेच खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.
या प्रकल्पाच्या मागील बाजूला मागील अनेक वर्षांपासूनच्या जुन्या कचऱ्याचे ढीग आहेत. या ढिगांपैकी शेवटच्या ढिगाला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली व आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने कचरा डेपोचा परिसर हा आग व धुराने व्यापून गेला होता. या घटनेची माहिती त्या ठिकाणावरील कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेत कळविल्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशामक बंबाद्वारे सदर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. पाणी मारलेल्या ठिकाणी जेसीबी मशिनद्वारे कचरा हलविण्यात येत होता. दरम्यान, ही आग न विझल्यास ती कचरा डेपोचा परिसर व्यापणार असल्याने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्नसुरू आहेत.वाºयाचा अडथळा : अग्निशामक दलाकडून प्रयत्नबंबाचे जवळपास पाच ते सहा टँकर पाणी मारत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आयएनएस शिवाजीचा अग्निशामक बंबदेखील आग नियंत्रणाकरिता आला होता. मात्र, वाºयाचा वेग असल्याने आग ढिगावर पसरत होती. दरम्यान, स्वच्छता विभागाचे निरीक्षक दिगंबर वाघमारे, हरिलाल बोरकर, बलकवडे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी या ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.