पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरून कवी वरवरा राव यांना पुणे पोलिसांनी हैदराबाद येथून पुन्हा अटक केली आहे. त्यांना रविवारी न्यायालायात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी दिली.याप्रकरणात ६ जून रोजी अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांना अटक करण्यात आली होती.सध्या पाचही जण न्यायालयीन कोठडीत आहेत. तर २८ आॅगस्टला कवी वरावरा राव, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा, मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, व्हर्णन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना अटक केली. मात्र सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्या ट्रान्झिट रिमांडला उच्च न्यायालयाने तातडीने स्थगिती दिल्याने त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तर वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्णन गोन्सालवीस यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र त्यांना देखील पोलीस कोठडी न देता नजरकैदेत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. काही दिवसांनंतर गौतम नवलाखा यांची नरजकैदेतून सुटका करण्यात आली होती. तर उर्वरीत आरोपी अद्याप नजरकैदेत आहेत.याकाळात अॅड. गडलिंग, सेन, राऊत, ढवळे आणि विल्सन यांनी अर्ज केला आहे. त्यातील सेन यांजा जामीन फेटाळण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दहा आरोपींच्या विरोधात गुरुवारी पुणे पोलीसांनी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. अटक करण्यात आलेले सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दिपु आणि कॉ. मंगलु अशा दहा जणांविरोधात ५ हजार १६० पानी दोषारोपत्र न्याायालयात दाखल केले. त्यात ८० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.दलीत समााजात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राम्हण केंद्रीत अजेंडाच्या विरोधात गेला आहे. त्यांच्यातील असंतषाचे भांडवल करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर गोंधळ घडवून आणण्याचे सीबीआय या माओवादी संघटनेचे काम एल्गार परिषदेच्य्या माध्यमातून या प्रकरणात अटक आरोपींना केले आहे. कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्णपरिणाम असून सीपीआयची (एम) पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भिमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचा निष्णन्न झाले आहे. तसेच सीबीआय माओवादी या संघटनेच्या ईस्टर्न रिजनल ब्युरो (ईआरबी) समितीचा सचिव व केंद्रीय समिती सदस्य किशन दा उर्फ प्रशांत बोस आणि रोना विल्सन यांच्यासह संघटनेच्या इतर भूमिगत सदस्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट केल्याचे स्पष्ट झाल्याचे पुणे पोलिसांनी याप्रकरणात सादर केलेल्या दोषारोपत्रात नमूद करण्यात आले आहे.
माओवाद्यांशी संबंध असल्याचा प्रकरणात वरवरा राव यांना पुन्हा अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 9:14 PM