तळेगाव स्टेशन : येथील हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष अॅड. रवींद्र दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, हिंदविजय अभ्यासिकेचे उद्घाटन, शालेय साहित्यवाटप, वै. सखुबाई हिंगे विद्यार्थी वसतिगृहास आर्थिक मदत व सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध कोर्सचे आयोजन आदी समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आले.पतसंस्थेने लाइफ लाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या साहाय्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. मावळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप भोगे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. माजी आमदार रुपलेखा ढोरे, नगराध्यक्षा सुलोचना आवारे, जयसिंग भालेराव, नगरसेविका नीलिमा दाभाडे, अॅड. मच्छिंद्र गटे, जगन्नाथ शेवकर, मधुकर ढोरे-पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ दाभाडे उपस्थित होते. लाइफलाइन हॉस्पिटलचे डॉ. सुनील कुंभार यांनी प्रास्ताविक केले.स्टेशन परिसरातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी पतसंस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन ग्रामप्रबोधिनी विद्यालयाचे प्राचार्य व्यंकट भताने यांच्या हस्ते झाले. सहायक निबंधक मुकुंद पवार यांच्या हस्ते नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप झाले. सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता सर्व सोर्इंनीयुक्त अभ्यासिका माजी मुख्याध्यापक राजाराम ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली.अॅड. दाभाडे यांनी आपल्या मनोगतात शालेय, तसेच महाविद्यालयीन शिक्षणाच्या खडतर प्रवासाचे वर्णन केले. शिक्षण मंडळाचे सभापती महेश फलके, रुडसेट संस्थेचे संचालक सुनील मेहेंदळे, संतोष दाभाडे-पाटील, राष्ट्रपती पदकविजेते शिक्षक श्याम इंदोरे, श्रीकृष्ण मुळे यांनी मनोगत व्यक्त करून दाभाडे यांना शुभेच्छा दिल्या.माजी उपनगराध्यक्ष श्याम दाभाडे, माजी जि.प. सदस्य प्रशांत ढोरे, वसंत बारवे, बाळासाहेब शिळीमकर, अनेक शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.संचालक राजेश सरोदे यांनी प्रास्ताविक केले. सचिव कैलास भेगडे यांनी सूत्रसंचालन केले, तर देवराम वाघोले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे संचालक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आमदार संजय भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबन भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, पुणे जिल्हा संघचालक सुरेश शहा, उद्योजक कौशिक शहा, अरुण भेगडे-पाटील, नंदकुमार शेलार, हभप माऊली दाभाडे, माजी नगरसेवक यशवंत दाभाडे, दिलीप खळदे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती रवींद्र आवारे, सुरेश दाभाडे आदींनी अॅड. रवींद्र दाभाडे यांना शुभेच्छा दिल्या. (वा.प्र)
रवींद्र दाभाडे यांच्या वाढदिनी विविध उपक्रम
By admin | Published: June 30, 2015 12:32 AM